Share

संपूर्ण औरंगाबादच कन्टेनमेंट झोन! सर्वेक्षण करणारी स्मार्ट टिमही पडली गोंधळात

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शासन निर्देशानुसार महापालिकेने २० पेक्षा अधिकचे कोरोना रूग्ण आढळणार्‍या वसाहती कन्टेनमेंट झोन म्हणून निश्चित करणे आवश्यक आहे. मात्र महिनाभरात शहरातील जवळपास सर्वच वसाहतींतून रूग्ण निघाले असून अजूनही निघत आहेत. त्यामुळे अख्खे शहरच कन्टेनमेंट झोन बनल्याची स्थिती आहे. कंन्टेनमेंट झोन निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण करणार्‍या औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन कंपनीची टीमही गोंधळात पडली आहे. त्यामुळे अजूनही शहरातील कन्टेममेंट झोन निश्चित झालेले नाहीत.

औरंगाबाद जिल्ह्यात १ मार्चपासून कोरोना संसर्गाने पुन्हा थैमान घातले आहे. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या गतीने वाढत आहे. त्यामुळे सक्रीय रूग्णांना सेवा देण्यास शासकीय तसेच खासगी आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत आहे. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा कोरोना स्ट्रेन अधिक गतीने पसरत असल्याने आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवरच शहरात कोरोना रूग्णांची संख्या अधिकचे आढळत असल्याने शासन निर्देशानुसार कन्टेनमेंट झोन निश्चित करून त्या ठिकाणी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे पालिकेने ठरवले. मात्र मागील महिनाभरापासून शहराच्या विविध भागांतून रोजच अधिकचे रूग्ण निघत असल्याने आजघडीला अशी एकही वसाहत नाही की जेथे २० पेक्षा कमी रूग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे अख्खे शहरच कन्टेनमेंट झोन बनल्याची स्थिती आहे.

अशा अवस्थेत पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शासन निर्देशानुसार कन्टेनमेंट झोन निश्चित करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम स्मार्ट सिटीच्या एएससीडीसीएल कंपनीच्या टीमला दिले आहे. मात्र मागील महिनाभरातील सर्वेक्षणात शहरातील सर्वच वसाहतींतून अधिकचे रूग्ण निघाले असल्याने टीमही गोंधळली आहे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम यांच्या नेतृत्वात स्मार्ट सिटीची टीम कन्टेनमेंट झोनचे सर्वेक्षण करत आहे. यासाठी शहरातील पालिकेच्या ३७ आरोग्य केंद्रांशी जोडलेल्या प्रत्येक भागातील आशा वर्कर्सकडून नव्याने आढळणार्‍या कोरोना रूग्णांचा डाटा संकलित केला जात आहे. त्या आधारावर कोणत्या भागात अधिकचे रूग्ण निघत आहे, हे तपासले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!