नंदीग्राम : पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर संपूर्ण देशाच लक्ष लागलेल आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वत: नंदीग्राम मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. १० मार्च रोजी नंदीग्राम मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारी ममता बॅनर्जी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, आणि याच मतदारसंघात ममता बॅनर्जी या जखमी झाल्या होत्या.
काल दुसऱ्या टप्प्यातील ३० जागांसाठी मतदान झाले आहे. नंदीग्राम या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे शुभेंदु अधिकारी एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. यांच्यात मुख्य लढत होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालच्या कूच बिहार येथे जाहीर सभा घेतली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कूच बिहार जिल्ह्यातील सीतलकूची येथील रॅलीमध्ये अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या जनतेसोबत नेहमीच अन्याय केला आहे. भाजप पश्चिम बंगालच्या विकासाठी दरवर्षी २ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. ममता दीदी नंदीग्राममध्ये पराभूत होणार आहेत असाही दावा शहा यांनी यावेळी केला.
‘दीदींच्या मनात जनतेची चिंता नाहीय. तर त्यांच्या मनात त्यांच्या भाच्याची चिंता आहे. त्या त्यांच्या भाच्याला मुख्यमंत्री करू पाहताहेत. भाच्याच्या कल्याणावर त्यांचा विश्वास आहे आणि मोदीजी प.बंगालमधील जनतेच्या कल्याणासाठी झटणारे नेते आहेत’, असं अमित शहा म्हणाले आहेत.
कूच बिहार येथील जाहीर सभेतून अमित शहा यांनी यावेळी नंदीग्राम मतदार संघाबाबत भविष्यवाणीच करुन टाकली आहे. ते म्हणाले कि, ‘दीदींनी प.बंगालमधील जनतेसोबत नेहमीच अन्याय केला आहे. म्हणूनच त्या आता तुम्हाला घाबरत आहेत. काल नंदीग्रामनं दाखवून दिलं आहे की त्या आता पराभूत होणार आहेत.
त्यांच्या सल्लागारानं दीदींना विचारलंय की आता तुम्ही कुठून लढणार? त्यावर दीदी म्हणाल्या की, बंगालचा उत्तर भाग वगळून मला इतर कुठूनही लढू द्या. हे उत्तर बंगालचे लोक मला जिंकवणार नाहीत’, असा खळबळजनक खुलासा अमित शहा यांनी भर सभेत केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
- सिटी एंट्री पॉईंटवरील कर्मचाऱ्यांना मनपाने सोडले वाऱ्यावर!
- ‘निवडणूक आयोगाची गाडी बिघडल्यावर भाजपची गाडी कशी मिळाली ? याचही उत्तर मिळणार नाही’
- संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करू नका, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- सोमय्यांच्या अडचणी वाढल्या; शिवसेना आमदाराने ठोकला 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

