बीड:जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना. काळाबाजारीचे प्रकरण समोर येत आहे. शासनाने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा अधिक पैसे उकळून रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री केल्याचा प्रकार बीड शहरातील बसस्थानकासमोरील लाइफलाइन रुग्णालयाशी संलग्न असलेल्या लाइफलाइन औषधी दुकानात गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. रुग्णाच्या नातेवाइकाने विक्रेत्यास बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन करत तक्रार दिली असून पोलिस या प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करणार आहेत.
जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी यांचे नातेवाइक शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये १४ एप्रिलपासून कोरोनामुळे भरती आहेत. तेथील डॉ. संकेत बाहेतींनी सोहनींना गुरुवारी रुग्णाला देण्यासाठी रेमडेसिविरची २ इंजेक्शन सांगितले. तेव्हा सोहनी हे डॉक्टरांचे पत्र घेवून बीड शहरातील बसस्थानकासमोरील लाइफलाइन मेडिकल येथे गेले. तेव्हा त्यांनी मेडिकलमधून २ इंजेक्शन खरेदी केले.
एमआरपीनुसार २ इंजेक्शनचे प्रत्येकी ५ हजार ४०० रुपयांप्रमाणे विक्रेत्याने १० हजार ८०० रुपये बिल आकारले. तेव्हा सोहनींनी दुकानदारास या इंजेक्शनची एवढी किंमत नसताना जास्तीचे पैसे का घेता अशी विचारणा केली तेव्हा मेडिकल चालकाने तुम्हाला इंजेक्शन घ्यायचे असेल तर घ्या या किमतीतसुद्धा तुम्हाला इंजेक्शन मिळणार नाही. तेव्हा सोहनींनी पावतीची मागणी केली असता पावती भेटत नाही, असे मेडिकल चालकाने सांगितले. शासनाने रेमडेसिविरला १४०० रुपयांची मर्यादा घालून दिलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा
- आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंचे तिहेरी सुवर्णयश
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

