Share

कोरेगाव-भीमा प्रकरणी कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही – जयंत पाटील

Published On: 

सातारा : कोरेगाव-भीमा प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे या दोघांवर रीतसर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. आता, ‘जे पुरावे पुढे येतील, त्या पद्धतीने कारवाई होईल, यात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही,’ असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.

कोरेगाव-भीमा प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने कारवाई करण्यासाठी पावले उचलले आहेत. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जर ते दोषी आढळले तर कारवाई केली जाईल, सर्वच पुरावे चाचपले जातील अशी भूमिका अनिल देशमुख यांनी स्पष्ट केली होती.

आता, पुरावे समोर येतील त्या पद्धतीने कारवाई होईल, यात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नसल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी अद्याप दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी कोरेगाव भीमा शौर्यदिनी दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!