Share

अमित शहांनी केली गांगुलीची विचारपूस, तर रुग्णालयाने दिली अपडेट

Published On: 

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका आला आहे. गांगुलीला उपचारांसाठी कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांनुसार गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे.

गांगुलीला जीममध्ये वर्कआऊट करताना त्रास जाणवू लागला. यानंतर गांगुलीने वुडलॅंड्स रुग्णालयात तपासणी करुन घेतली. तपासणीत छातीत गंभीर त्रास असल्याचं निदान झालं. सौरव गांगुलीची पहिली एन्जियोप्लास्टी करण्यात आली आहे. यामध्ये त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत एक स्टेन टाकण्यात आली आहे. गांगुलीच्या हृदयातील तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहेत. एका रक्तवाहिनीत 90 टक्के ब्लॉकेज आहे. सर्जरीनंतर त्याची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवसांत त्याच्या हृदयात आणखी दोन स्टेंट्स टाकले जाऊ शकतात.

दरम्यान, केंद्रीय मंत्री व भाजप नेते अमित शहा यांनी गांगुलीची पत्नी डोना गांगुली यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनीही डोना गांगुलीला फोन करून चौकशी केली. तर, सौरव गांगुलीला सौम्य असा हृदयविकाराचा धक्का लागला, तो योग्यवेळी रुग्णालयात आला. आता त्याची तब्येत स्थिर आणि चांगली आहे, असं वूडलॅन्ड्स रुग्णालयाचे डॉक्टर खान यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!