Share

राजकारण करताना चारित्र्य मोकळे हवे; संजय राऊतांनी खुलासा करून मोकळे व्हावे – आंबेडकर

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, भाजपमधून नुकतंच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आदी नेत्यांना ईडीने नोटीस बजावल्याचं गेल्या काही वर्षात दिसून येतंय. आता हा ईडीचा वाद आणखी चिघळल्याचं दिसून येत आहे.

यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘संजय राऊतांना पैसा हा राऊतांकडूनच आला. त्यांच्यात नात्याचे संबंध नाहीत, असे ईडीचे म्हणणे आहे. तेव्हा संजय राऊत यांनी 55 लाख कशासाठी आलेत, याचा खुलासा करावा. म्हणजे संजय राऊत मोकळे होतील,’ असं ते म्हणाले.

तर, ‘नेते हे व्यापारी आणि राजकर्ते एकाच वेळी झाले की ईडी मागे लागते. राजकारण करताना चारित्र्य मोकळे हवे. ईडीने रेड केली म्हणजे तुम्ही टॅक्सेस भरलेले नाहीत. इथल्या व्यापारी कारखानदारांच्या मागेही ईडी लागली आहे. व्यापारी म्हणून काम करताय तर राजकारणाचं शिल्ड घेऊ नये,’ असा सल्ला देखील आंबेडकर यांनी नेत्यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!