Share

‘शुद्र देशातील राजकारण ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही’

Published On: 

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देशातील राजकारण, सद्यःस्थिती यावर भाष्य केलं आहे. राज्यात औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्यावरून राजकारण तापलं आहे. तर, बाहेरील राज्यांमध्ये लव्ह-जिहाद बाबतीतील कायद्यांवरून अनेक वाद-विवाद सुरु आहेत.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटक अशा भाजपशासित राज्यांमध्ये लव्ह जिहादचा कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र, यामुळे धार्मिक वातावरण देखील काहीसं रंगलेलं दिसत आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे.

‘शुद्र राजकारण ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत देशातील परिस्थिती बदलणार नाही,’ असं विधान त्यांनी केलं आहे. तर, ‘देशात जात व धर्मावरून राजकारण सुरु आहे. यामुळे देशाचं विघटन होईल,’ अशी चिंता देखील आंबेडकरांनी व्यक्त केली. हजारो वर्षांच्या गुलामगिरीमुळे देश काहीच शिकला नाही. आजही विचारांची गुलामी सुरु असल्याची टीका देखील त्यांनी केली.

दरम्यान, भारतात हिंदुंची लोकसंख्या 80 टक्के असताना देशात धार्मिक राजकारण करण्याची गरजच काय?’ असा सवाल निर्माण करत त्यांनी देशातील धार्मिक राजकारणावर आगपाखड केली आहे. प्रकाश आंबेडकर मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी ही भूमिका मंडळी आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!