औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
आता याच मुद्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना आमचा त्यास विरोध असल्याचं थोरात यांनी ठामपणे सांगितलं आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसत आहे.
‘आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल,’ असे बाळासाहेब थोरातांनी ठामपणे सांगितंल आहे.
महाविकास आघाडीचं सरकार हे किमान सामान कार्यक्रमावर आधारित असून नामांतरापेक्षा विकासाला प्राधान्य दिलं जाईल, असं म्हणत थोरातांनी शिवसेनेला आठवण देखील करून दिली आहे. यावरून सद्या वातावरण तापलं असून भाजप, मनसेसह मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
औरंगाबादचं संभाजीनगर करण्यावर शिवसेना ठाम आहे. हे नामकरण लवकरचं केलं जाईल. असं ते म्हणाले. तर, काँग्रेसच्या भूमिकेमुळे सरकारला बाधा होईल का? असा प्रश्न केल्यानंतर त्यांनी, ‘काँग्रेस सत्तेतून बाहेर पडूच शकत नाही, त्यांनाही मंत्रिपद हवं आहे’ असं उत्तर देत खैरेंनी एकप्रकारे काँग्रेसला देखील मंत्रिपदाची आठवण करून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शुद्र देशातील राजकारण ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही’
- उदयनराजेंचा शब्द राखला ! तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायत झाल्या बिनविरोध
- ‘त्यांचा नेम चुकला आणि बाण धनुष्यातचं घुसला…’
- कोहली-रहाणेच्या तुलनेवर सचिनचे भाष्य
- लक्षात येतेय का थयथयाटाचे कारण? भाजप नेत्याचा राऊतांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

