Share

भारतीय संघाच्या अडचणीत होणार वाढ? रोहित शर्मासह इतर पाच खेळाडूंच्या समावेशाबाबत शंका

Published On: 

ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मेलबर्न इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं यजमान संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. यासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-१ ची बरोबरी साधली आहे. सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर अखेरचा व चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे.

सात जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये होणार आहे. सिडनीला पोहचण्यापूर्वी भारतीय खेळाडू मेलबर्न येथेच सराव करत आहेत. दरम्यान, शुक्रवारी, 1 जानेवारी रोजी एका चाहत्याने व्हिडिओ जारी केला आहे, ज्यात उपकर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी हॉटेलमध्ये बसलेले दिसत आहेत. यावेळी त्यांनी चाहत्यांची गळाभेट घेतल्याचं देखील व्हायरल झालं आहे.

त्यामुळे, या सर्वांना भारतीय संघापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे पाचही खेळाडू भारतीय आणि ऑस्ट्रेलिया संघापासून विभक्त झाले आहेत परंतु ते प्रशिक्षण घेऊ शकतील, असं ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डातर्फे सांगण्यात आलं आहे.

मात्र, बायो बबलपासून विभक्त झाल्यामुळे आता या सर्व प्लेयर्सना 14 दिवसांचा क्वारंटाईन नियम लागू होऊ शकतो. जर क्वारंटाईन व्हावं लागलं तर या खेळाडूंना पुढील कसोटी सामन्यांना मुकावं लागू शकतं. याचा परिणाम भारताच्या विजयी वाटचालीवर होऊन संघाला आणखी मोठा धक्का सहन करावा लागेल. भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा, विकेटकीपर ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. याबाबत बीसीसीआय व सीए अधिक चौकशी करत असून या खेळाडूंबाबत अजून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!