Share

निवडणूक संपल्याचा परिणाम; सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक संपताच देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल २५ पैसे प्रतिलिटर आणि डिझेल ३० पैसे प्रतिलिटर महाग झाले. विशेष म्हणजे भारतीय बास्केटच्या कच्च्या तेलाचा सरासरी दर एप्रिल महिन्यात ६४.४० डॉलर प्रतिबॅरल होता, तो मार्चपेक्षा (६४.७३ डॉलर प्रतिबॅरल) कमी आहे.

निवडणूक आयोगाने २६ फेब्रुवारीला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती. त्यानंतर २७ फेब्रुवारीला पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली होती. नंतर ३ मेपर्यंत दरवाढ झाली नाही. २४ मार्च, ३० मार्च आणि १५ एप्रिलला दरात किरकोळ कपात झाली होती.

२ मे रोजी निवडणूक निकाल आल्यानंतर फक्त एक दिवस दिलासा मिळाला. ४ मेपासून पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. गेल्या तीन दिवसांत झालेल्या बदलांत पेट्रोलचे दर ५९ पैसे आणि डिझेलचे दर ६९ पैसे प्रतिलिटर असे वाढले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!