Share

रेमडेसिवीर इंजेक्शन गरिबांना सरकारी शुल्कात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

Published On: 

वर्धा : वर्ध्याच्या जेनेटिक लाइफ सायन्सेसमध्ये रेमडेसिविरचे उत्पादन सुरू झाले आहे. महाराष्ट्रात रेमडेसिविरचे उत्पादन सुरू झाल्याने काळाबाजार थांबेल. गरिबांना सरकारी शुल्कात इंजेक्शन उपलब्ध होईल. जेनेटिक लाइफ सायन्सेस अतिशय कमी वेळात भारत सरकारची परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

वर्ध्याच्या सेवाग्रामस्थित महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात जेनेटिक लाइफ सायन्सेस कंपनीत रेमडेसिविर उत्पादनाला सुरुवात झाली. येथे दररोज ३० हजार व्हायलची निर्मिती होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अल्पावधीत उत्पादनास परवानगी मिळवून दिली. ६ मे रोजी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जेनेटिक लाइफ सायन्सेस कंपनीत उत्पादनाची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कंपनीचे डॉ. महेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.

गडकरी यांनी उत्पादन सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना, औषध उत्पादन डोळ्यांनी बघायला मिळाले असल्याचे सांगितले. याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पहिल्यांदा करून महाराष्ट्रातदेखील सर्व ठिकाणी देण्याचा प्रयत्न राहील. त्यानंतर देशात इतरही ठिकाणी दिले जाईल. सगळे काही आम्हालाच मिळाले पाहिजे, असा आग्रह नाही. मात्र वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

इंजेक्शनकरिता अस्वस्थता होती. काही लोकांनी इंजेक्शनचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केला. आता विदर्भातील वर्ध्यात उत्पादन सुरू होत असल्यामुळे ती वेळ राहणार नाही. गोरगरिबांना सरकारने ठरवून दिलेल्या किमतीत इंजेक्शन उपलब्ध होईल, असेही गडकरी म्हणाले. वर्ध्यात उत्पादन सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!