Share

‘कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नका’, पंतप्रधान मोदींचे राज्यांना आवाहन

Published On: 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांना राज्यांतील कोरोनाच्या स्थितीची माहिती देण्यात आली. मोदींनी औषधांचा तुटवडा, लसीकरण याबाबत निर्देश दिले. राज्यांनी कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, १२ राज्यांत एक लाखापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असल्याची तसेच सर्वात प्रभावित जिल्हे आणि राज्यांतील आरोग्य सुविधांच्या पायाभूत आराखड्याबाबतही माहिती देण्यात आली. आरोग्यसेवांच्या पायाभूत आराखड्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक पैलूंबाबत राज्यांना मदत दिली जावी आणि मार्गदर्शन केले जावे, असे निर्देशही मोदींनी दिले.

पंतप्रधानांनी औषधांच्या उपलब्धतेचाही आढावा घेतला. त्यांना रेमडेसिविरसहित इतर औषधांच्या उत्पादनात वेगाने होत असलेल्या वाढीबाबत माहिती देण्यात आली. मोदींनी पुढील काही महिन्यांत लसींचे उत्पादन वाढवण्याच्या योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेतला. लॉकडाऊन असला तरी लसीकरणाची सुविधा दिली जावी, असे निर्देश मोदींनी दिले

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!