Share

भूमिपूजन केलेल्या रस्त्याची दूरवस्था

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पिशोर ते मोहाडी पाणंद रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून रस्त्याने पायी चालणे सुद्धा दुरापास्त झाले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते खडकी नदीपर्यंत असलेल्या या पाणंद रस्त्यावर गावातून येणारे सांडपाणी रस्त्यावर येऊन मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर गावातील ग्रामस्थांची वर्दळ असते.

रस्ता नादुरुस्त असल्याने मोठा गणपती रस्त्याने तीन किलो मीटर फेरा मारून जावे लागत आहे. शेतात जाणारे शेतकरी व बाहेरगावी जाणारे प्रवासी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यावरचे मोठ मोठे दगड उघडे पडले आहेत.सांडपाणी गटार फुटून रस्ता चिखलमय झाला आहे.

गावातील कचरा रस्त्यावर तुंबला असून पिशोर गावाला जोडणा-या सर्व पाणंद रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. पण या रस्त्याचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला वावडे आहे का? गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी सातत्याने होत आहे. ग्रामस्थांनी स्वत: पुढाकार घेत या रस्त्याची दुरूस्ती केली. परंतु फक्त निवणुकीच्या तोंडावर रस्ता कामाचे भूमिपूजन करण्याचा सपाटा केला गेला होता. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून चार वर्षे उलटले तरी या रस्त्याचे काम न होता उलट या रस्त्याकडे दुर्लक्षच होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!