Share

पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांसह वीट उत्पादकही चिंतेत

Published On: 

जालना: गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यात काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झाले होते, तसेच काही ठकाणी पाऊसही पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकरी तसेच वीट उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होताच आहे पण आता त्याच सोबत वीट उत्पादकांचे देखील कच्च्या विटा भिजून नुकसान होण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यात विटांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. यासाठी कच्चा विटांची निर्मिती करून त्या भाजल्या जातात. कच्च्या विटा तयार करण्याचे काम उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाल्याने तसेच काही ठिकाणी पाऊस पडल्याने वीट उत्पादकांची तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसाने कच्चा विटा झाकण्यासाठी कामगारांना मोठी कसरत करावी लागली.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे गेल्या वर्षी पासून बांधकाम व्यवसाय जेमतेमच सुरु होता, आता थोडं फार सुरळीत सुरु झाले असल्यामुळे वीट उत्पादकांनी पुन्हा उत्पादन सुरु केले, मात्र पावसाने खोड घातल्याने वीट उत्पादन पुन्ह थांबण्याची शक्यता आहे तासेच कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा जोर धरत आहे. त्यामुळे वीट उत्पादक नुकसानीत असल्याचे मत अनेक उत्पादकांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!