मुंबई – कोरोना संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून 1 मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात 144 कलम लागू राहील.हा निर्णय घेतानाच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारेही अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले आहेत. जीवनावश्यक बाबींवर कुठलेही निर्बंध न ठेवता इतर बाबींवर परिणामांचा सारासार विचार करून निर्बंध जारी करण्यात आले आहेत.
त्याअंतर्गत काय सुरू राहील आणि काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल याबाबतची माहिती काल रात्री जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे. या नियमावलीनुसार रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येत असून राज्यभर कलम 144 लागू होणार आहे. निर्बंधांतून सूट असलेल्यां व्यक्तींव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही. लग्न समारंभासाठीही राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 50 नव्हे, तर आता 25 जणांच्या उपस्थितीत लग्न उरकावं लागणार आहे.दरम्यान, नियामांचे उल्लंखन करण्याऱ्यांवर आणि कार्यलय चालकांवर कडक कारवाई केली जाईल असा आदेश देण्यात आला आहे.
दुसऱ्या बाजूला अंत्यविधीसाठी केवळ २० जणांचीच उपस्थिती असावी. धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली असून धार्मिक ठिकाणे, प्रार्थनास्थळे बंद राहणार आहेत सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणं, उपक्रम, सेवा बंद राहतील. जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार हे यातून वगळण्यात आले आहेत. अपवाद श्रेणीत असलेल्या सेवा आणि व्यवहारांना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत परवानगी राहील.मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवादश्रेणीत घेण्यासंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत.
जीवनावश्यक श्रेणीत रुग्णालयांसह सर्व आरोग्य सेवा, वैद्यकीय विमा कार्यालयं, औषध दुकाने, औषध कंपन्या, लसींचं उत्पादन आणि वितरण, सँनेटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणं, इतर पूरक उत्पादनं आणि सेवांचा समावेश राहील.पाळीव प्राण्यांसाठीची खाद्यदुकानं, प्राण्यांसंबंधी सेवा, प्राण्यांचे निवारागृह, वाण्याची, किराणा सामानाची दुकानं, भाजीपाला फळविक्रेते, दूधडेअरी, बेकऱ्या, सर्व प्रकारच्या खाद्यान्न दुकानांचाही जीवनावश्यक श्रेणीत समावेश आहे.
शीतगृहं आणि वखार सेवा विषयक आस्थापना, सार्वजनिक वाहतूक-हवाई सेवा, रेल्वेसेवा, टँक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसगाड्या, विविध राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन आणि अनुषंगिक सेवा सुरू राहणार आहेत. स्थानिक प्रशासनांच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती कामांसह, सार्वजनिक कामं, ऱिझर्व्ह बँक आणि तिनं आवश्यक ठरवलेली सर्व कामं, सेबीनं मान्यताप्राप्त ठरवलेली सर्व कामं संचारबंदीच्या काळात सुरू ठेवण्याची परवानगी आहे.
महत्वाच्या बातम्या
- रुग्णवाहिकेतून न आल्यानं उपचारास रुग्णालयाचा नकार, ऑक्सिजनअभावी प्राध्यापिकेचा मृत्यू
- मराठवाड्याला अवकाळीचा फटका; नांदेडमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू, दोन म्हशी दगावल्या
- आज रात्रीपासून राज्यात सर्वत्र संचारबंदी, नियमांचा भंग केल्यास होणार कठोर कारवाई
- कोरोनाची लक्षणे दिसू लागताच घाबरलेल्या कामगाराने गळफास घेऊन आयुष्य संपविले
- अवकाळी पावसाने केले राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

