चेन्नई : मगंळवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.
दुसऱ्या डावातील आखेरच्या चार षटकात गोलंदाजानी चांगली कामगीरी करत कोलकाताच्या संघाचा विजयाचा घास हिरावुन घेतला. सामना संपल्यानंतर रोहितने प्रतिक्रिया देताना म्हणाला की.’प्रत्येक खेळाडूने सर्वोत्तम कामगीरी केल्याने आम्हाला दमदार पुनरागमन शक्य झाले. या विजयानंतर आमचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे.’ या विजयाचे श्रेय रोहितने गोलंदाजाना दिले आहे.
यावेळी बोलताना रोहितने राहुल चाहरचे विशेष कौतुक केले. त्याने संघाला अतिशय महत्वपुर्ण बळी मिळवून दिले. तर अंतिम षटकातील कृणाल पांड्याच्या गोलंदाजीचेही त्याने कौतुक केले.तर फलंदाजीविषयी बोलताना तिथे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. असे रोहित म्हणाला. तर फलंदाजीत त्याने सुर्यकुमार यादवचे विशेष कौतुक केले.
महत्वाच्या बातम्या
- लग्न समारंभासाठी राज्यात नवे निर्बंध; आता 25 जणांच्या उपस्थितीत लग्न उरकावं लागणार
- मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये इतकी धूळफेक आहे की विचारता सोय नाही – फडणवीस
- ‘कुंभ आणि मरकजमध्ये कोणतीही तुलना होता कामा नये’
- १४ एप्रिलला लॉकडाऊन लावल्याने आठवलेंनी व्यक्त केली नाराजी
- फलंदाजीत अपयश आले तरी आंद्रे रसेलने केला गोलंदाजीत मोठा पराक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

