Share

धक्कादायक! कोरोनाच्या संकटात महिला तस्करी, बालविवाह वाढले

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात गेल्या वर्षभरात लैंगिक हिंसाचार प्रचंड प्रमाणावर वाढल्याची धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्राने दिली आहे. अनेक हिंसाग्रस्त देशांमध्ये लैंगिक छळाला युद्धाची क्रूर युक्ती व राजकीय शोषणाचे हत्यार बनवण्यात आले आहे. त्यामुळे मानवाधिकार व सुरक्षा धोक्यात आली, असा खळबळजनक खुलासा यूएनने केला आहे. लैंगिक हिंसाचार मांडणारा अहवाल यूएनचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस यांनी सार्वजनिक केला आहे.

यात १८ देशांचा हवाला देत सांगण्यात आले आहे की, जगातील हिंसाग्रस्त क्षेत्रात अत्याचार किंवा लैंगिक शोषणाचा महिलांविरोधात सर्रासपणे वापर करण्यात आला. ७० टक्क्यांहून अधिक काळ्या यादीतील संघटना व सैन्य दलांनी सातत्याने षड्यंत्र रचले. विशेषकरून कुख्यात ‘इस्लामिक स्टेट’ अर्थात ‘इसिस’ आणि अल-कायदा व संलग्नित बंडखोर संघटनांचा समावेश आहे. त्यांनी संयुक्तरीत्या लैंगिक हिंसाचार घडवल्याचे अहवालात ठळकपणे नमूद केले आहे.

हिंसाग्रस्त देशांमध्ये राष्ट्रीय लष्कर किंवा पोलिस दलांना शांतता सैनिकांच्या अभियानात सहभागी होऊ दिले नाही; कारण हिंसाचाराला खतपाणी घालण्यात संबंधित देशांचे पोलीस व जवान लिप्त होते. म्यानमारचे लष्कर व सीमावर्ती गार्डनेसुद्धा महिलांवर जुलमी अत्याचार केला. प्रामुख्याने आफ्रिकन राष्ट्र कांगो, सुदान व दक्षिण सुदान, सीरियाचे सशस्त्र दल व शीघ्र कृती दल लैंगिक शोषणात सहभागी होते. सोमालिया व पंटलँडमधील सुरक्षारक्षकांनीही महिलांचे शोषण केले. त्यामुळे या सर्वांना यूएनने काळ्या यादीत समाविष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!