नवी दिल्ली: देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच, येत्या काळात अनेक राज्यात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये कोरुना बरोबरच इतर सह व्याधी असलेल्या रुग्णांना मृत्यूचा धोका जास्त असल्याचं सांगण्यात येत होत. तर वयोवृद्ध मध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे देखील आतापर्यंतच्या अभ्यासातून समोर अालं आहे. त्यानंतर आता व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये करोनाची लक्षणं तीव्र असून, अशा लोकांना करोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचं एका अभ्यासातून समोर आल आहे.
ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये धुम्रपान, लठ्ठपणा वा उच्च रक्तदाब यांच्या तुलनेत शारीरिक हालचाल न करणाऱ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचं या अभ्यासाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आलं आहे.
या संशोधनासाठी ५० हजार करोनाबाधितांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये शारीरिक हालचाल न करणे, यामुळे करोना होण्याचा आणि मृत्यू ओढवण्याचा धोका जास्त असल्याचं सांगण्यात आलं आहे. ज्या व्यक्ती व्यायाम करत नव्हत्या. जे शारीरिक हालचालीही फार करत नव्हते, अशा ४८ हजार४४० लोकांमध्ये करोनाची लक्षणं अधिक दिसून आली. यात काहींना रुग्णालयात दाखल करावं लागलं. काहींना आयसीयूची भरती करावं लागलं, काहींचा मृत्यू झाला. जानेवारी आणि ऑक्टोबर २०२० मध्ये अमेरिकेत हा अभ्यास करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या :
- कर्नाळा बँक घोटाळ्याचा तपास अंमलबजावणी संचलनालयाकडे जाणार…
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआय समोर हजर, चौकशी सुरु
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुडिजच्या अंदाजामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा
- कोरोनाचा कहर : उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
- ‘माझी मैना गावावर राहिली’, अण्णाभाऊंच्या गीताचे विडंबन; अजय-अतुल विरोधात परभणीत तक्रार


