चैत्र पाडव्याच्या सणाला हिंदू संस्कृतीमध्ये प्रचंड असे महत्व आहे. विशेषतः मराठी नववर्षाच्या निमित्ताने पाडव्याच्या खरेदी विक्रीचे महत्व देखील मोठे आहे. कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा पाडवा असतो. त्यामुळेच सर्वस्तरावरील खरेदी-विक्रीचे व्यवहार तसेच, ग्रामीण भागातील शेतीतील सालगड्याचा नवीन करार करणे हे नियमीतरपणे मुहुर्तावर होत असते. मागच्या वर्षी कोरोना संसर्गाचा प्रसार खुप झपाट्याने वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन केले होते. तर यंदा देखील राज्य सरकारने अंशत: लॉकडाऊन, कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे पाडव्याला ही खरेदी ठप्प पडली आहे.
पाडव्याच्या मुहूर्तावर साधारण दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनाची, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर आदी वस्तुंची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. जिल्ह्यात दरवर्षी सर्वसाधारणपणे ११ ते १२ कोटी रुपयांची उलाढाल होत असते. सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे यावर्षी पाडव्याच्या मुहूर्तावरील सराफा बाजारातील ही उलाढाल अन्य व्यवहारांप्रमाणे ठप्प होती. शहर, जिल्ह्यात अंदाजे १ हजार 150 छोटी – मोठी सराफा दुकाने आहेत. सर्वसाधारणपणे या दुकानांमधुन साडेतीन हजारावर कारागीरांची संख्या आहे. सराफा – पेठेमध्ये पाडव्याचा मुहूर्तावर व्यवहार हा महत्वपूर्ण असतो. याच बरोबर लग्न मुहूर्त असतात. त्यामुळे लग्नाच्या दागिण्यांची खरेदींचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात असते. याहीवर्षी कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाने अन्य व्यापाऱ्यांप्रमाणे सराफा व्यापाऱ्यांना सुद्धा मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
यंदा लग्नाच्या सोहळ्याला सरकारने कमी नातेवाईक आणण्याच्या निर्बंध घातल्याने तसेच जेवणाच्या पंगतीवर देखील या मुळे कमी होवू लागले आहेत. त्यामुळे सर्व जाती – समाजामधील लग्न सोहळे साधेपणामुळे पार पडत असल्याने सोने, कपडा, फर्निचर, भांडे, किराणा, धान्य खरेदीवर याचा थेट परिणाम जाणवत आहे. त्यामुळे शहरीभागासह आता ग्रामीण भागामध्ये देखील छोटे – मोठ्या व्यापाऱ्यांना पाडव्याच्या या मुहूर्ताला खुप मोठा फटका बसला आहे. कोराना रुग्ण वाढीचा तसेच लॉकडाऊन, अंशत: लॉकडाऊन कडक निर्बंधामुळे सर्व व्यवसायांसह सोने – चांदी व्यवसायावर खुप मोठा फटका बसला असल्याचे जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष सचिन अंबिलवादे यांनी सांगितले. सराफापेठेत 2016 च्या एक्साईज कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशात काळा दिवस पाळण्यात आला.
- कर्नाळा बँक घोटाळ्याचा तपास अंमलबजावणी संचलनालयाकडे जाणार…
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआय समोर हजर, चौकशी सुरु
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुडिजच्या अंदाजामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा
- कोरोनाचा कहर : उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
- ‘माझी मैना गावावर राहिली’, अण्णाभाऊंच्या गीताचे विडंबन; अजय-अतुल विरोधात परभणीत तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

