🕒 1 min read
औरंगाबाद : मनमाड ते परभणी २२५ किमी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण कधी होईल असे खासदार डॉ. भागवत कराड यांनी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यानां राज्यसभेत विचारले. तेव्हा रेल्वेमंत्र्यानी भागवत कराडांना कोणतेही ठोस उत्तर देणे टाळले. यामुळे रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी अपल्याच पक्षातील खासदार भागवत कराड यांना आडचणीत सापडले आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या रेल्वे प्रकल्पाच्या वाट्याला केवळ एकूण निधीच्या १.४५ टक्केच रक्कम आली. या पार्श्वभूमीवर डॉ. भागवत कराड यांनी राज्यसभेत मराठवाड्याचे मागासलेपण घालवण्यासाठी मनमाड ते परभणी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण कधी असा प्रश्न उपस्थित केला. तसेच औरंगाबादेत चिकलठाणा येथे पिटलाइन व्हावी यासाठी डॉ. कराड यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाला दुसऱ्यांदा प्रस्ताव पाठवायला लावले. परंतु रेल्वेमंत्र्यांनी ‘नांदेडला पिटलाइन असल्याने औरंगाबादला गरज काय?’ अशी विचारणा केली यामुळे डॉ. कराड यांना तोडांवर पाडण्याची वेळ आली. भाजपचे खासदार डॉ. कराड यांनी पाठवलेल्या औरंगाबाद-नगर-पुणे, औरंगाबाद-बीड या नवीन रेल्वेमार्गाच्या प्रस्तावासाठीही अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद झाली नाही.
सिकंदराबाद झोनमध्ये नांदेड विभाग हा दक्षिण मध्य रेल्वेला दुसऱ्या क्रमांकाचा महसूल देणारा आहे. असे असताना अर्थसंकल्पात या झोनमधील इतर पाच विभागांना भरघोस निधी देण्यात आला, तर नांदेड विभागाच्या वाट्याला केवळ एकूण निधीच्या १.४५ टक्केच रक्कम आली. तसेच यावेळी मराठवाडा रेल्वे प्रकल्पातील औरंगाबाद पिटलाइन, नवीन सर्वेक्षणातील रेल्वेमार्ग, दुहेरीकरण यासंबंधी रेल्वेमंत्र्यांनी ठोस उत्तर देणे टाळले. उलट औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वेमार्गाबाबत रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, ‘पुणे ते दौंड दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गाचे नगरपर्यंत दुहेरीकरण केले जाणार आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘दिशा सालियन प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मुलाला वाचवलं’
- वादग्रस्त प्रायव्ह्सी पॉलिसीनंतर व्हॉट्सऍपचे भन्नाट फिचर येणार
- संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
- राम मंदिरासाठी देणग्या न देणाऱ्यांची नावे आरएसएस गोळा करत आहे ?
- गणेश जंयतीच्या शुभमुहूर्तावर बाप्पा सुवर्ण सिंहासनावर आरुढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
