मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. नुकतीच तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिनं आपली जीवनज्योत विझवली. ही आत्महत्या आहे की तिला कोणी मारलं ? असा प्रश्न भाजपा महिला आघाडीने उपस्थित करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं आहे. या २२ वर्षीय तरूणीचे ठाकरे सरकारमधील कथित मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण यांचे कुटुंबीय दबावात असल्याची चर्चा सुरु असताना या प्रकरणात पोलीस दबावात असल्याचा संशय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता.यानंतर पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात असून गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच त्यांच्या राजीम्याची देखील मागणी जोर धरत होती. या आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं होतं, राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाने चांगलीच लावून धरली होती. अखेर या प्रकरणात संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे, टीव्ही ९ ने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याची माहिती आहे.
वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, संजय राठोड यांचा राजीनाम्याबाबत सोमवारपासून विविध चर्चा सुरु होत्या. यात शिवसेनेत संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून दोन मतप्रवाह असल्याचंही दिसून आलं, मातोश्रीवर आज शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे, तत्पूर्वी संजय राठोड यांनी हा राजीनामा दिला आहे.
संजय राठोड यांच्या या राजीनाम्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप मला काही माहिती नाही, परंतु संजय राठोड हे प्रकरण सरकारशी संबंधित आहे, सरकारचे प्रमुख लोकं त्या विषयाशी संबधात निर्णय घेतील, संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार, मंत्री आहेत, अनेक वर्षापासून ते शिवसेनेचा चेहरा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत, शिवसेनेत दोन गट वैगेरे काही नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
तसेच शिवसेना आमदार, खासदार यांची नियमित बैठक आहे, त्यात मतदारसंघाचे प्रश्न, संघटनात्मक बांधणीसोडून बाकी इतर विषय नाहीत, संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मला माहिती नाही, मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या विषयावर बोलत आहेत, त्यामुळे सरकार भूमिका घेत नाहीत, असं कसं म्हणू शकतो असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गणेश जंयतीच्या शुभमुहूर्तावर बाप्पा सुवर्ण सिंहासनावर आरुढ
- धनंजय मुंडे टोकाचे निर्लज्ज, गंभीर आरोपांनंतरही राजीनामा दिला नाही: निलेश राणे
- हिगोली जिल्ह्याला १६० कोटींच्या आराखड्यास मंजूरी; ५८.३२ कोटींची अतिरिक्त निधी
- ‘राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही; गुन्हाही दाखल व्हावा’
- …म्हणून ग्रेटा थनबर्गने ‘ते’ ट्वीट डिलीट केलं ; पोलिसांचा मोठा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

