Share

राम मंदिरासाठी देणग्या न देणाऱ्यांची नावे आरएसएस गोळा करत आहे ?

Published On: 

बंगरूळ : ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला होता.

राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे. या राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्यास देखील सुरुवात झाली आहे. तर, मंदिर उभं करण्यासाठी लागणार खर्च हा करोडो रामभक्तांमार्फत संकलित केला जात आहे.राम मंदिरासाठी देणगी देणाऱ्या प्रत्येकाला संबंधित पैशांची पावती दिली जात आहे.

विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर निर्माण सहयोग अभियान सुरु केले आहे. संघ आणि भाजपने देखील निधी संकलनासाठी सक्रिय सहभाग घेतला असून देशभरात हे अभियान राबविले जात आहे.या प्रकल्पासाठी आतापर्यंत देणग्यांच्या स्वरुपात १ हजार ५११ कोटी रुपयांचा निधी उभा राहिला आहे.

दरम्यान, या निधी संकलनावरून आता राजकारण होताना पाहायला मिळत आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी राम मंदिराच्या देणगीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत देणग्या न देणाऱ्यांची नावे गोळा करत असल्याचा दावा केला आहे.

‘राम मंदिर निधी समर्पण अभियान’चे कार्यकर्ते कर्नाटकात देणग्या गोळा करण्याचे काम करत आहे. मात्र, जे स्थानिक पैसे देत नाहीत, त्यांची नावे लिहून घेत आहेत. ते असे का करत आहे, याची मला कल्पना नाही. मात्र, नाझींनी जे जर्मनीमध्ये केले, तेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!