🕒 1 min read
मुंबई : गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले आहेत. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणात भाजपकडून मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे.
या सर्व आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं होतं, विरोधी पक्ष भाजप कडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर अखेर संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते निलेश राणे यांनी राठोड यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी सुशांत सिंह राजपूत गूढ मृत्यू प्रकरणाचा संदर्भ देत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड अडकले म्हणूनच त्यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच SSR आणि दिशा सालियन प्रकरणात देखील आदित्य ठाकरेचं नाव घेण्यात आल होत. मात्र, मुख्यमंत्री यांनी स्वतःच्या मुलाला वाचवलं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 16, 2021
‘पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड अडकले म्हणूनच त्यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच SSR आणि दिशा सालियन प्रकरणात देखील आदित्य ठाकरेचं नाव घेण्यात आल होत. मात्र, मुख्यमंत्री यांनी स्वतःच्या मुलाला वाचवलं’ असे ट्वीट करत निलेश राणे यांनी खळबळजनक दावा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एमएस धोनी चित्रपटात सुशांत सोबत काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्याने संपवलं जीवन
- तरूण उद्योजक बेपत्ता; घरी सोडली आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी
- भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वृध्द ठार; बायपासवरील निशांत पार्कसमोरील घटना
- मागितले होते काय अन मिळाले काय? आकृतीबंधावरुन औरंगाबाद पालिकेची घोर निराशा
- टूलकिट प्रकरणाचे महाराष्ट्रात देखील धागेदोरे; बीडमधला संशयित फरार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
