Share

वादग्रस्त प्रायव्ह्सी पॉलिसीनंतर व्हॉट्सऍपचे भन्नाट फिचर येणार

Published On: 

नवी दिल्ली: व्हॉट्सऍपच्या नवीन पॉलिसी वरून जगभरातून टीका होत होती. ग्राहकांच्या माहितीचा वापर करण्याची परवानगी द्या नाही तर सेवा बंद करणे ही एक जबरदस्ती असल्याचं बोललं जात होत. यावर व्हॉट्सऍपने स्पष्टीकरण देखील दिले होते.

त्यांनतर आता नेहमीच नवनवीन फिचरचे प्रयोग करणाऱ्या व्हॉट्सऍपचे चॅटिंग मजेशीर व्हावे, यासाठी व्हॉट्सऍप कंपनी अशाच एका भन्नाट फिचरवर काम करत आहे. त्यामुळे एका व्हॉट्सऍप अकाऊंटचा वापर चार ठिकाणी करता येईल.

मल्टी डिव्हाईस असे या फिचरचे नाव असून युजर्ससाठी ते फायदेशीर आहे. सध्या तरी हे फिचर व्हॉट्सऍपच्या आयओएस बीटा वर्जनवर उपलब्ध आहे. लवकरच ते अँड्रॉईड फोनमध्ये उपलब्ध होऊ शकते. मल्टी डिव्हाईस फिचरच्या माध्यमातून एकाचकेळी अनेक डिव्हाईसवर एका अकाऊंटचा वापर करता येणार आहे.

डब्ल्यूएबेटाइन्फोने दिलेल्या माहितीनुसार आयओएस बीटामध्ये लॉगआऊट फिचर आहे. हे फिचर मल्टी डिव्हाईस सपोर्टचा भाग असेल. एक युजर विविध ठिकाणी कनेक्टेड डिव्हाईसशी लॉगआऊट करू शकणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!