🕒 1 min read
सांगली – १०० कोटींच्या खंडणीचा आरोप मुंबईचे माजी आयुक्त परमबीरसिंह यांनी केल्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने (CBI) छापे टाकण्यात आले. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर टाकण्यात आलेला छापा म्हणजे राजकीय षडयंत्र असून केंद्रातले सत्ताधारी सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.केंद्रातील असणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून सीबीआयचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप करत याबाबतचे सत्य लवकरच जनतेसमोर येईल, असा विश्वासही मंत्री कदम यांनी या वेळी व्यक्त केला.
दरम्यान सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता देशमुखांना अटक करा अशी मागणी याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी केली आहे.अनिल देशमुखांनविरोधात सबळ पुरावे सीबीआयकडे असल्याने त्यांना अटक झाली पाहिले अशी जोरदार मागणी जयश्री पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- लसीकरणासाठी गर्दी होऊ नये म्हणून कडा या गावात वापरली ‘ही’ पद्धत
- कुछ कशाला ठाकरे सरकार म्हणजे शत प्रतिशत गडबड घोटाळा है; भाजपचे राऊतांना प्रत्युत्तर
- अभिनेत्री हिना खानच्या वडिलांच्या निधनानंतर गौहर खान झाली ‘या’ कारणासाठी ट्रोल
- CBIने गुन्हा दाखल केल्यानंतर जयश्री पाटील आक्रमक, देशमुखांना अटक करण्याची केली मागणी
- ‘सर्वांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकार अखंड कार्यरत आहे’


