बीड: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे तसेच जिल्ह्यात देखील कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. या वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावळ रोखणहयसाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. तसेच लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात, त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच गर्दी ताळण्यासाठी जिल्ह्यातील कडा या गावात टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे.
कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास महिनाभरापासून लसीकरण सुरू आहे. मात्र, मागील तीन चार दिवसांपासून नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत आता गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीचा अवलंब सुरु करण्यात आला आहे. सर्व पात्र व्यक्तींना लस मिळणार असून एकाच दिवशी गर्दी न करण्याचे आवाहन सरपंच अनिल ढोबळे यांनी केले आहे.
कडा येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल आरबे व सर्व आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी मेहनत घेत आहेत. गर्दी टाळण्यासाठी आरोग्य केंद्रात प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक सत्राची उपलब्ध लस साठा याची माहिती प्रदर्शनीय भागात लावण्यात येईल. आष्टी तालुक्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्र, व ग्रामीण रुग्णालय अशा या ६ आरोग्य संस्था मध्ये लस उपलब्ध झाली असून एकाच आरोग्य संस्थेत गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवून, या प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन सरपंच अनिल ढोबळे यांनी केले आहे.
गर्दी टाळून सामाजिक अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनाने नवीन टोकन पद्धत तयार करण्यात आली आहे. एका व्यक्तीला एकच टोकन देण्यात येईल व टोकन देण्यापूर्वी आधार कार्ड इत्यादी सरकारी ओळख पत्र तपासण्यात येतील. एका वेळी १० टोकनधारकांना लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल व जमा केलेले टोकन निर्जंतुक करून पुन्हा वापरण्यात येतील.
महत्वाच्या बातम्या
- काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत; CBIच्या धाडीनंतर चंद्रकांतदादांचे सूचक वक्तव्य
- कलाकारांच्या वागण्यावर अन्नु कपुर यांनी दर्शवली तिव्र नाराजी; ट्विट करत केले ‘हे’ अवाहन
- उस्मानाबादेत मोकाट फिरणाऱ्या ९० जणांची तपासणी; ४ जण कोरोना बाधीत
- राधेचा ट्रेलर पाहुन टायगर झाला दिशा पाटनीवर फिदा; इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत केले कौतुक
- देशातील ऑक्सिजन संकट निवारण्यासाठी हवाई दल इन ऍक्शन; सिंगापूरहून आणणार मदत


