मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर, देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सीबीआयच्या विविध पथकांनी देशमुख यांच्या तब्बल 10 ठिकाणांवर छापे मारले.
दरम्यान सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता देशमुखांना अटक करा अशी मागणी याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी केली आहे.अनिल देशमुखांनविरोधात सबळ पुरावे सीबीआयकडे असल्याने त्यांना अटक झाली पाहिले अशी जोरदार मागणी जयश्री पाटील यांनी केली आहे.
जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान यावर बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की, मी आधीच सांगितले होते अनिल देशमुख ही मुघलाई नाही तुम्ही भ्रष्टाचार करून देशाला लुटू शकत नाही. कारण हे संविधानाचे, भारतीय कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे तुम्ही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल कारण सीबीआयला दिलेल्या पुराव्यांमुळे देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जयश्री पाटील म्हणाल्या, मलबार हिल पोलीस स्थानकात दाखल केलेल्या गुन्ह्याची कॉपी सीबीआयला दिली तसेच सीबीआयला आवश्यक मदत, पुरावे सादर केले. तसेच अनिल देशमुखांमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांचेही पुरावे सीबीआयला दिले आहेत. त्यामुळे सीबीआयने आज गुन्हा दाखल करत देशमुखांच्या घरासह १० विविध ठिकाणी सीबीआय छापेमारी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- लसीकरणासाठी गर्दी होऊ नये म्हणून कडा या गावात वापरली ‘ही’ पद्धत
- कुछ कशाला ठाकरे सरकार म्हणजे शत प्रतिशत गडबड घोटाळा है; भाजपचे राऊतांना प्रत्युत्तर
- अभिनेत्री हिना खानच्या वडिलांच्या निधनानंतर गौहर खान झाली ‘या’ कारणासाठी ट्रोल
- संचारबंदीमुळे परभणी एसटी महामंडळाला लाखोंचा फटका, प्रवाशी मिळेना !
- काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत; CBIच्या धाडीनंतर चंद्रकांतदादांचे सूचक वक्तव्य


