Share

अभिनेत्री हिना खानच्या वडिलांच्या निधनानंतर गौहर खान झाली ‘या’ कारणासाठी ट्रोल

Published On: 

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे काही दिवसापुर्वी निधन झाले होते. त्यांना ह्रदयविकाराचा तिव्र झटका आला होता. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी हिना मुंबईबाहेर होती. बातमी कळताच ती मुंबईत परतली. या घटनेनंतर तिच्या अनेक कलाकारांनी तिचे सांत्वन केले होते.

मात्र अभिनेत्री गौहर खानने हिनाच्या वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडीयावर पोस्ट करुन सांत्वन केले नाही. यामुळे तिला हिनाच्या चाहत्यांनी ट्रोल केले. कारण गौहर आणि हिना या दोघीही ’बिग बॉस’च्या घरात चांगल्या मैत्रीणी होत्या. तसेच जेव्हा गौहर खानचे वडिल वारले तेव्हा हिना खानने सोशल मीडीयावर पोस्ट करुन तीचे सांत्वन केले होते. यामुळे हिनाच्या चाहत्यांनी गौहर खानला ट्रोल केले.

नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने या ट्रोलिंगला उत्तर दिले आहे. यावेळी ती म्हणाली.’ सोशल मीडियावर पोस्ट करून काय साध्य होणार आहे. मला जे हवं ते मी करते. हिनाचं आणि माझ खूप जवळचं नातं आहे आणि हे इतरांना सिद्ध करून दाखवायची गरज मला नाही वाटत. तुमचे नकारात्मक विचार तुमच्याकडेच ठेवा. हिनाच्या वडिलांना मी माझ्या प्रार्थनांमध्ये ठेवलं. सोशल मीडियावरील लोकांना काही सिद्ध करून दाखवायचं नाहीये.’ असं म्हणत तिने ट्रोलरला उत्तर दिलं. हिनाच्या वडिलांचं निधन झालं त्या रात्री गौहर तिच्या पतीसोबत कोकिलाबेन इस्पितळात गेली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!