🕒 1 min read
नवी दिल्ली- सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकार अखंड कार्यरत आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीच्या छत्तरपूरमधील सरदार पटेल कोव्हीड केअर सेंटरला त्यांनी काल भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
परत नव्यानं सुरू करण्यात आलेल्या या सेंटरची तसच नवीन ५०० ऑक्सिजन खाटांची त्यांनी यावेळी पाहणी केली. आठवड्याभरातच ही संख्या १००० पर्यंत वाढवण्यात येणार आहे. छत्तरपूर कोव्हीड केअर सेंटर पुन्हा सर्व आवश्यक त्या आरोग्य सुविधांसह सज्ज होत आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण हलका होण्यास अशा सेंटर्समुळे मोठी मदत होईल, असंही डॉक्टर हर्षवर्धन म्हणाले.
दरम्यान, देशात कोरोना महामारीची स्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. दररोज नव्याने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगवेगळे रेकॉर्ड बनवत आहे. भारतात शनिवारी दिवसभरात ३ लाख ४९ हजार ६९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ६९ लाख ६० हजार १७२ एवढी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- लसीकरणासाठी गर्दी होऊ नये म्हणून कडा या गावात वापरली ‘ही’ पद्धत
- कुछ कशाला ठाकरे सरकार म्हणजे शत प्रतिशत गडबड घोटाळा है; भाजपचे राऊतांना प्रत्युत्तर
- अभिनेत्री हिना खानच्या वडिलांच्या निधनानंतर गौहर खान झाली ‘या’ कारणासाठी ट्रोल
- CBIने गुन्हा दाखल केल्यानंतर जयश्री पाटील आक्रमक, देशमुखांना अटक करण्याची केली मागणी
- काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत; CBIच्या धाडीनंतर चंद्रकांतदादांचे सूचक वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
