Share

पुणे-बंगळूरू महामार्ग अजूनही बंदच, रस्त्यावर तीन फुट पाणी

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : पुणे-बंगळूरू महामार्गावरील कोल्हापूरपर्यंतची वाहतूक आज रविवारी तिसऱ्या दिवशीही बंद आहे. यामुळे वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. कोल्हापूरजवळच्या पुलाची शिरोली जवळ रस्त्यावर अजूनही सुमारे तीन फुटाहून जास्त पाणी आहे. पुराचे पाणी कमी होण्याची गती फार संथ आहे. पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिल्यास उद्या सोमवारी सकाळी वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.

सांगली फाटा येथे पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या महापुराच्या पाणी पातळी काल रात्री पासून दिड फुटाने कमी झालेली आहे. कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. पाणी संथ गतीने कमी होत आहे. पाणी आडवे मागे सरकले असले तरी महामार्गावरील पाण्याची उंची कायम आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अद्याप बंद असून, महामार्ग सुरू झाल्याच्या अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कागलच्या पुढे मांगूर येथे पाणी आले होते. तर, पुलाची शिरोली, सांगली फाटा येथेही ६ ते ८ फूट पाणी आल्याने कालपासून हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आज किंचित पाणीपातळी ओसरली असली, तरी राष्ट्रीय महामार्ग सुरू होण्यास आणखी एक-दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.

उजळाईवाडी परिसरात कालपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ट्रकचालक, छोटय़ा चारचाकी वाहनाचे चालक या पुराच्या पाण्यामुळे अडकले. याशिवाय जिल्ह्यातील ३५ मार्गांसह कोल्हापूर-रत्नागिरी, बेळगाव, गोवा, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे हे मार्गही पुरामुळे बंद झाले आहेत. आंबा घाटात दरड कोसळल्यामुळे कोकणात जाणारा रस्ता दोन दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!