Share

श्रीगणेशाच्या आगमनाची-विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही, राज्य सरकारचे स्पष्ट निर्देश

Published On: 

🕒 1 min read

लातूर : कोरोना विषाणू प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांबरोबरच यासोबत संलग्न करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे लातूर जिल्हयातील सर्व नागरिकांकडून, गणेश मंडळाकडून व सर्व प्रशासकीय यंत्रणाकडून काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळास आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीस लातूर शहरातील विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी १० सप्टेंबर रोजी होणारी श्रीगणेश स्थापना आणि १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीगणेश विर्सजनबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मंदीरे आहेत त्यांनी श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मंदीरात करावी. अन्य ठिकाणी संबंधीत मंडळाचे पदाधिकारी/सभासद यांच्या घरी श्रीगणेशाची स्थापना करावी. याशिवाय कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी स्थापना करु नये. गणेशोत्सव-२०२१ संबंधाने शासनाच्या मार्गदशक सूचनांन्वये श्रीगणेशाचे मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता चार फुट व घरगुती गणपती दोन फुटाच्या मर्यादेत असावी. ग्रामीण भागामध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवावी. त्याचप्रमाणे श्रीगणेशाची प्रतिष्ठापना गावाच्या ग्रामदेवतेच्या अथवा गावातील इतर मंदीरात करावी. गणेशमूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येवून दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून, दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रानिक माध्यमाव्दारे उपलब्ध करुन देण्यात यावे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!