Share

गरीब दलित विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांचे अनुदान कधी सुरु होणार ?

Published On: 

पुणे – महाराष्ट्र राज्याने नेहमी दुर्बलत्तर जनवर्गाच्या कल्याणाचा विचार केला आहे. विशेषतः अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व भटके व विमुक्त जमातींना प्राधान्य देण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. या समाजाचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करणे, सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करणे या गोष्टीला प्राधान्यक्रम दिला आहे. या समाजातील रहिवाशांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्याच्या दृष्टीने समाजातील विद्यार्थ्यांना मोफत निवासाची व भोजनाची सोय करावी. या समाजातील मुलांच्या जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता करुन त्यांना प्रभावी शिक्षण देता यावे. सेवा व सहकार्य ही प्रेरणा उराशी  बाळगणाऱ्या  योग्य शिक्षकांच्या देखरेख व मार्गदर्शांना खाली सधन मूलभूत शिक्षण देता यावे, यासाठी आश्रमशाळा योजनेची निर्मिती करण्यात आली.

आश्रमशाळांच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न होत असतात. मात्र दलित समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या राज्यातील १६५ आश्रमशाळांचे अनुदान अडविल्यामुळे या शाळांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.समाजातील सर्वात शोषित आणि वंचित घटकांची शैक्षणिक कोंडी करण्यामागे सरकारचा नेमका उद्देश काय आहे  असा सवाल आता कर्मचारी विचारू लागले आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपा सरकारने या आश्रमशाळांसाठी अनुदान सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. तथापि, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या आश्रमशाळांना अनुदान देण्याच्या आधीच्या निर्णयाची अंमलबजावणी का झाली नाही हा सवाल अनुत्तरीत आहे. दरम्यान, आता याच मुद्द्यावरून आता विरोधक महाविकास आघाडी सरकारचा दलितविरोधी चेहरा उघड झाल्याची देखील टीका करत आहेत.

अनुदान मिळत नसल्याने आश्रमशाळा बंद पडण्याची आणि दलित समाजातील गरीब विद्यार्थ्यांचा आधार नष्ट होण्याची भीती आहे. या आश्रमशाळा चालविणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वखर्चाने फार काळ काम चालू ठेवणे अवघड आहे. महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर या १६५ आश्रमशाळांचे अनुदान सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.महाविकास आघाडी सरकारने दलितांसाठीचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केले. गेली दोन वर्षे दलित विद्यार्थ्यांसाठीच्या आश्रमशाळांचे अनुदान सुरू केलेले नाही त्यामुळे आघाडी सरकार दलितविरोधी आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!