🕒 1 min read
दिल्ली: देशात निवडणुकीपूर्वी अनेक मुद्दे जिवंत केले जातात. जसे हिजाबचा मुद्दा आला. असे अनेक मुद्दे असतात जे अचानक येतात. अलीकडच्या काळात विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यांवर अधिक भर दिला जातो. आणि त्याच्यावरच राजकारण केले जाते. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला. “चार राज्यातील निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. मात्र हा विजय सत्कर्मी लगावा असेच आम्ही म्हणतो. या देशामध्ये विरोधी पक्ष राहणे ही देशाची आणि लोकशाहीची गरज आहे. देशाचे पंतप्रधान हे एका पक्षाचे नसतात. हे या मंडळीना समजायला हवे. भाजपने आपल्याच पक्षातील नेत्यांना फार गुडघ्यापेक्षा खुजं करून टाकलं आहे. मोदींचे नेतृत्व हे सर्वोच्च आहे. मात्र त्यांना भाजपने खुजं केलं आहे.”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मोदी हे फक्त आमचे नेते आहेत. ते फक्त आमचे पंतप्रधान आहेत, असे चित्र भाजपनेच निर्माण केले. मात्र पंतप्रधान देशाचे नेतृत्व करतात. दुर्दैवाने पंतप्रधानांचे भाषणे पाहिली तर त्यांनीही या चक्रातून बाहेर यायला हवे. आणि स्वतःला बजवायला हवे, की ते देशाचे नेते आहेत. असेही राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- IND vs SL: पंत-अय्यरने दुसऱ्या दिवशी रचला इतिहास; सामन्यात घडले ‘हे’ मोठे विक्रम!
- फडणवीसांनी ‘ती’ क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती- प्रकाश आंबेडकर
- IND vs SL: ऋषभ पंतने रचला नवीन इतिहास; कपिल देव आणि धोनीला मागे सोडले!
- योगी आणि महाराजांची जागा मठात असून राजकारणात नाही; आमदार प्रणिती शिंदेंचे वक्तव्य
- “म्हणून मला नोटीस दिली” – देवेंद्र फडणविसांचा खुलासा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
