🕒 1 min read
मुंबई: भारत विरुद्ध श्रीलंका खेळल्या जाणाऱ्या डे-नाईट टेस्ट सामन्यावर रोहित आणि कंपनीने त्यांच्यामध्ये पूर्ण ताबा मिळवला आहे. भारताने श्रीलंकेसमोर ४४६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लंकेच्या संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २८-१ अशी धावसंख्या उभारली आहे. मात्र या संपूर्ण दिवसात अनेक मोठे विक्रम रचले गेले आहेत.
टीम इंडियासाठी टेस्ट फॉरमॅटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या (rishabh pant) नावावर गेला आहे. पंतने श्रीलंकेविरुद्ध कसोटीच्या दुसऱ्या डावात अवघ्या २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. याआधी हा विक्रम कपिल देव (kapil dev) यांच्या नावावर होता. कपिलने १९८२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ३० चेंडूत अर्धशतक केले होते.तसेच पंतने ३० कसोटी सामन्यांच्या ५१ डावांमध्ये ४४ षटकार ठोकले आहेत. पदार्पणानंतर सर्वाधिक षटकार मारण्याचा पराक्रम पंतने केला आहे. डे नाईट कसोटीच्या दोन्ही डावात ५०+ धावा करणारा श्रेयस अय्यर (shreyas iyer) हा भारतातील पहिला आणि जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. त्याने पहिल्या डावात ९२ आणि दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या.
विराट कोहली (virat kohli) टेस्ट क्रिकेटमध्ये ३५व्यांदा एलबीडब्ल्यू आऊट झाला आहे.तसेच गेल्या ७३ आंतरराष्ट्रीयसामन्यात त्याला एकही शतक झळकावलेले नाही. श्रीलंकेच्या पहिल्या डावात दोन विकेट्स घेत रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० बळी पूर्ण केले आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये ६५० बळी घेणारा अश्विन भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. अश्विनने आतापर्यंत कसोटीत ४३८, वनडेत १५१ आणि टी-२० मध्ये ६१ विकेट्स घेतल्या आहेत. सोबतच जसप्रीत बुमराहने 8व्यांदा कसोटीच्या एका डावात ५ किंवा त्याहून अधिक बळी घेतले. त्याने घरच्या मैदानावर पहिल्यांदाच एका डावात ५ विकेट घेतल्या. पिंक बॉल टेस्टमध्ये पहिल्यांदाच या वेगवान गोलंदाजाने एका इनिंगमध्ये ५ विकेट्स घेतल्या आहेत. असे काही मोठे विक्रम भारतीय खेळाडूंनी केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता!
- योगी आदित्यनाथांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मंत्र्यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब
- अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करून घ्या पेन्शनचा लाभ!
- “…हे बोलायची हिम्मत राऊतांमध्ये आहे का?”- फडणवीसांचा सवाल
- “म्हणून मला नोटीस दिली” – देवेंद्र फडणविसांचा खुलासा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
