Share

IND vs SL: ऋषभ पंतने रचला नवीन इतिहास; कपिल देव आणि धोनीला मागे सोडले!

Published On: 

मुंबई: भारत आणि श्रीलंका दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंत ने अनेक कीर्तिमान आपले आपल्या नावे केली आहेत. ज्यात त्याने कपिल देव आणि धोनीलाही मागे सोडले आहे. ऋषभने २८ चेंडूत अर्धशतक करत नवीन इतिहास रचला आहे. ज्यात त्याने या दिग्गजांचे रेकॉर्ड मोडीत काढले.

ऋषभ पंतने  (rishabh pant) कपिल देवचा (kapil dev) भारतीय फलंदाजाने सर्वात वेगवान कसोटी अर्धशतक करण्याचा जवळपास ४० वर्ष जुना विक्रम मोडला. कपिल देव यांनी डिसेंबर १९८२ मध्ये कराची कसोटीत पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना ३० चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. सोबतच त्याने एसएस धोनीचा सर्वात वेगवान अर्धशतकांचा विक्रमही मोडीत काढला. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम धोनीच्या नावावर होता. २००६ मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध ३४ चेंडूत अर्धशतक केले होते. आता ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्ध २८ चेंडूत अर्धशतक केले.

टेस्ट क्रिकेट मध्ये विकेटकिपरकडून सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम आता पंतच्या नावे गेला आहे. याआधी ऋषभ पंत, एमएस धोनीने ३४ चेंडूत २००६ मध्ये पाक विरुद्ध तर ऑस्ट्रलियाच्या इयान स्मिथने 3४ चेंडूत विरुद्ध १९९० मध्ये हा विक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हकच्या नावावर आहे. ज्याने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ चेंडूत हा विक्रम रचला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!