🕒 1 min read
सोलापूर: आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर निशाणा साधत टीका केली. काँग्रेस काळात गॅस सिलिंडरची किंमत साडेतीनशे रुपये होती, पण आता तीच किंमत हजारांवर पोहचली आहे. आता फक्त घोषणांचा पाऊस पाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी मते मागत आहेत. योगी आणि महाराजांची जागा मंदिर, मठात असून राजकारणात नाही. ते राजकारणात आल्यानेच देशाचे वाटोळे होत आहे. अशी टीका प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी केली आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत निश्चितपणे कॉंग्रेसला मोठे यश येईल. महापालिकेवर कॉंग्रेसचाच झेंडा फडकणार आहे. सर्वसामान्य जनता हीच कॉंग्रेसची ताकद असल्याचेही आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान हेरिटेज येथील कॉंग्रेसच्या विजयी संकल्प मेळाव्याप्रसंगी कॉंग्रेसमधील काही पदाधिकारी बोलत होते. यावेळी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सध्या जाती-धर्मात भांडण लावून निवडणुका जिंकल्या जात आहेत. तरीही, दोनवेळा लोकसभेला पराभव झाला म्हणून खचून न जाताना पुन्हा जोमाने लढायला हवे.
महत्वाच्या बातम्या:
-
फडणवीसांनी ‘ती’ क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती- प्रकाश आंबेडकर
-
IND vs SL: पंत-अय्यरने दुसऱ्या दिवशी रचला इतिहास; सामन्यात घडले ‘हे’ मोठे विक्रम!
-
योगी आदित्यनाथांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मंत्र्यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
