Share

फडणवीसांनी ‘ती’ क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती- प्रकाश आंबेडकर

Published On: 

🕒 1 min read

अकोला : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभा अध्यक्ष्यांना राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असलेला पेनड्राईव्ह दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. तद्पश्चात फडणवीसांना पोलिसांनी नोटीस पाठवली. तसेच याप्रकरणी काल(१३ मार्च) मुंबईच्या सायबर पोलिसांनी फडणवीसांचा दोन तास जबाब नोंदवला. दरम्यान, या मुद्द्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिक्रिया दिली असून फडणवीसांनी ‘ती’ क्लिप जनतेसमोर जाहीर करायला हवी होती, असेही आंबेडकर म्हणाले आहेत.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की,‘मी फडणवीसांना मैदानी खेळाडू व दिलेर समजत होतो. परंतु त्यांची ती वृत्ती मला दिसली नाही. ‘ती’ क्लिप त्यांनी सभापतींना सभागृहात दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेत खालच्या दर्जाचे राजकारण म्हणतात.’ तसेच फडणवीसांनी ‘ती’ क्लिप लोकांपुढे जाहीर करायला हवी होती. ही सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. जर त्यांनी तसे केले असते तर पोलिसांनी नोटीस देखील दिली नसती, असेही आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, मुंबईच्या सायबर पोलिसांनी फडणवीसांचा दोन तास जबाब नोंदवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशीबाबतची माहिती दिली. यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘मी गोपनीय कायद्याचा भंग केला आहे आणि मीच आरोपी आहे, असे प्रश्न मला विचारण्यात आले.’ तसेच कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी गप्प बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!