Share

देशवासियांची माफी मागणाऱ्या तलवारबाज भवानी देवीला पंतप्रधानांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची भवानी देवी पदक पटकावण्यात अपयशी ठरली. मात्र तलवारबाजीत ऑलिम्पिकमध्ये भारताकडून जाणारी पहिली खेळाडू म्हणून तिने इतिहास रचला आहे. या पराभवानंतर भवानी देवीने सोशल मीडीयाच्या द्वारे देशवासीयांनी माफी मागितली होती.

भवानी देवीच्या या माफीच्या ट्विटला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देत तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदीनी भवानी देवीच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना लिहीले आहे की, ‘ऑलिम्पिक स्पर्धेत तु तुझं सर्वोत्तम दिले आणि हेच कायम लक्षात राहणार आहे. विजय आणि पराभव हा तर आयुष्याचा एक भागच आहे. तुझ्या योगदानाचा संपुर्ण देशाला अभीमान आहे. तु संपुर्ण देशाच्या नागरीकासाठी एक प्रेरणास्थान आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत झालेल्या पराभवनानंतर भवानी देवीने ट्विट करत संपुर्ण देशवासीयांची माफी मागितली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भवानी देवीने पहिल्या सामन्यात नादिया अझिझिला १५-३ असे पराभूत करत तलवारबाजीत भारतासाठी सामना जिंकणारी पहिली महिला ठरली. मात्र दुसऱ्या सामन्यात भवानी देवीने मनॉन ब्रुनेटकडून तिला ७-१५ असा पराभव स्विकारावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!