मुंबई : या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वाईट कामगीरीमुळे पृथ्वी शॉला संघातील स्थान गमवावे लागले होते. यानंतर त्यांने सातत्याने स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. या कामगीरीच्या जोरावर त्याला श्रीलंका दौऱ्यात स्थान देण्यात आले.
आता इंग्लंड दौऱ्यातील दुखापतीमुळे संघाबाहेर झालेल्या शुभमन गीलच्या जागी त्याची संघात निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यात तो सलामीवीर रोहित शर्मासोबत सलामीला खेळण्याची शक्यता आहे. त्याने जर इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी केली तर आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पृथ्वी शॉ हा त्याचा श्रीलंका दौऱ्यातील कर्णधार शिखर धवनचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे.
शिखर धवन आणि रोहित शर्मा हे दोन्ही खेळाडू बऱ्याच कालावधीपासून भारतीय संघासाठी सलामीला खेळत आहे. मात्र २०१९ विश्वचषक स्पर्धेपासून या दोघांच्या जोडीला नजर लागली. २०१९ विश्वचषक स्पर्धेदरम्यान शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्याजागी के एल राहुलला सलामीला संधी देण्यात आली. यानंतर सलामीला के एल राहुल यशस्वी झाल्यामुळे शिखर धवनचे स्थान धोक्यात आले होते. मात्र के एल राहुलचा फलंदाजी क्रम बदलल्याने सलामीला पुन्हा धवनला संधी मिळण्याची संधी होती. मात्र पृथ्वी शॉला पुन्हा संघात स्थान मिळाल्याने धवनचे स्थान पुन्हा धोक्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्यांचे बोलणे कठोर आहे, गैरसमज करू नका’ भास्कर जाधवांनी अरेरावी केल्यानंतर महिलेची प्रतिक्रिया
- पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर
- ‘राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा झाली का?’, फडणवीस म्हणाले…
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
- मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

