मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी गरजूंना मदत करण्याचे कार्य केले. अशीच मदतीचा हात अभिनेता सोनू सूदने पुढे केला. शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. सोनू सोशल मिडीयावर देखील सक्रीय असतो. त्याच्या रोजच्या दिवसातील अनेक अनुभव तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतच त्याने एक गमतीशीर व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CRx2zjBAyzy/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडीओ मध्ये सोनु चपाती बनवत असताना दिसून येत आहे. सोनू सूद आपला ढाबा सुरू करत असताना दिसून येतोय. या व्हिडीओमध्ये सोनू सूद म्हणतो, ‘साहेब, चपाती तयार आहे. प्रसिद्ध आहे सोनू सूदचा ढाबा…यापूर्वी पंजाबमध्ये सुरू केलेला त्यावेळी तंदूर लहान होत्या. म्हणून चपाती स्वस्त होती..पण यावेळेला चपाती महाग झाली आहेत. बॉस, सध्या शिकतो. एकदा जर तुम्ही सोनू सूदच्या हातची चपाती खाल्ली तर इतर दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी तुम्ही चपातीसाठी जाणार नाही, हे मात्र नक्की. आम्ही खूप फास्ट चपाती बनवतो.’ त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी यावर लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत.
कोरोना काळात अनेक गरजूंना मदत पोहोचवण्याचे काम सोनू निःस्वार्थी भावनेने करत आहे. त्याच्यासारख्या व्यक्तीने राजकारणात यावे अशी इच्छा अनेक सेलेब्रीटींनी तसेच सामान्य माणसांनी जाहीरपणे व्यक्त केली होती. परंतु यावर त्याने आपला असा कोणताही ही विचार नसल्याचे सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- सुर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्कार न मिळाल्याने झहिर नाराज म्हणाला,’हा तर अन्याय’
- माहीचा ‘तो’ लुक सोशल मीडीयावर तुफान व्हायरल
- श्रीलंका दौऱ्यातील अपयशी कामगीरीमुळे संजुचे करिअर धोक्यात
- पृथ्वीच्या संघातील पुनरागमनामुळे कर्णधार धवनचीच जागा धोक्यात
- ‘त्यांचे बोलणे कठोर आहे, गैरसमज करू नका’ भास्कर जाधवांनी अरेरावी केल्यानंतर महिलेची प्रतिक्रिया


