Share

‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द

Published On: 

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाचे खेळाडू शुभमन गील, आवेश खान आणि वॉशिग्टन सुंदर जखमी झाल्याने आगामी कसोटी मालिकेतून बाहेर पडले. त्याच्याजागी बदली खेळाडू म्हणून बीसीसीआय निवड समीतीने पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव या दोघाची निवड केली. या दौऱ्यात सुर्यकुमार यादवला कसोटी पदार्पणाची संधी मिळु शकते.

गेल्यावर्षी २६ ऑक्टोबर रोजी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात स्थान न मिळाल्याने सुर्यकुमार यादव पुरता खचला होता. यानंतर त्याने दोन दिवसातच आयपीएलमध्ये आरसीबी संघाविरुद्ध ४३ चेंडुत ७९ धावांची नाबाद खेळी करत आपण भारतीय संघासाठी पात्र आहोत हे सिद्ध करुन दाखवले. यानंतर त्याच्या कामगीरीच्या सहाय्याने मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२०चे जेतेपद पटकावले. त्याच्या या कामगिरीची दखल घेत यावर्षी झालेल्या मार्च महिन्यातील इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिकेत त्याला भारतीय संघातून पदार्पणाची संधी देण्यात आली.

पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. मात्र याच मालिकेतील पुढील सामन्यात संधी मिळताच त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलाच चेंडु खेळताना जोफ्रा आर्चरला षटकार लगावत धडाकेबाज पदार्पण केले. या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावत सामनाविराचा पुरस्कार पटकावला. तर १८ जुलै रोजी एकदिवसीय पदार्पण केल्यानंतर दुसऱ्याच सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावले.

पहिल्याच एकदिवसीय मालिकेत त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याच्या या कामगिरीची दखल घेत त्याला आता इंग्लंड दौऱ्यातील कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासुन भारतीय संघातील चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाची जागा तो भरुन काढेल अशी अपेक्षा क्रिकेट रसिकांना आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!