मुंबई : भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू हे इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे भारताने श्रीलंका दौऱ्यात इतर खेळाडूंना संधी देण्यात आली होती. या दौऱ्यात प्रामुख्याने खेळाडूंचे दोन गट होते. एक गट होता नवीन युवा खेळाडंचा ज्यांना पदार्पणाची संधी मिळणार होती. तर दुसरा गट होता अपयशी खेळाडूंचा जे वाईट कामगिरीमुळे संघाबाहेर झालेले होते.
यात भारताचा युवा खेळाडू संजु सॅमसनकडे भारतीय संघात स्थान पक्के करण्याची संधी होती. मात्र टी-२० मालिकेत सपशेल अपयशी कामगीरीमुळे त्याच्यासाठी संघाचे दरवाजे कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता आहे. यापुर्वी देखील संजुला भारतीय संघात संधी देण्यात आली होती. मात्र तो या संधीचे सोने करु शकला नाही. संजुने आतापर्यंत ८ टी-२० सामने खेळताना १३.७५ च्या सरासरीने केवळ ११० धावा करण्यात यश आले.
सद्यस्थितीत भारताकडे यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतचा भक्कम पर्याय उपलब्ध आहे. जर तो जखमी झाला तर के एल राहुल यष्टीरक्षणाची जबाबदारी संभाळु शकतो. जर हे दोन्ही खेळाडू अपयशी ठरले तर इशान किशनचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. या परिस्थीतीत संजु सॅमसनचे संघात पुनरागमन जवळपास अशक्य असल्याने त्याची कारकिर्द संपुष्टात आली असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- पृथ्वीच्या संघातील पुनरागमनामुळे कर्णधार धवनचीच जागा धोक्यात
- ‘त्यांचे बोलणे कठोर आहे, गैरसमज करू नका’ भास्कर जाधवांनी अरेरावी केल्यानंतर महिलेची प्रतिक्रिया
- पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर
- ‘राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा झाली का?’, फडणवीस म्हणाले…
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

