Share

माहीचा ‘तो’ लुक सोशल मीडीयावर तुफान व्हायरल

Published On: 

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये क्रिकेट म्हणजे धर्माच्या पलीकडे मानला जातो. याची प्रचीती अनेकदा येत असते. भारतीय संघाचे सामने आणि खेळाडू यांची चाहत्यांमध्ये क्रेज ही खुपच जास्त आहे. यात अनेक क्रिकेटपटू निवृत्तीनंतरही लोकप्रियता बाधीत ठेवतात.

असाच एक भारतीय क्रिकेटपटू म्हणजे महेंद्रसिंह धोनी. गेल्या वर्षी २०२० मध्ये १५ ऑगस्ट रोजी महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषीत केली. यानंतर भारतीय संघासाठी बीसीसीआयने रेट्रो जर्सीचे अनावरण केले. यानंतर धोनीला एकदा त्या रोट्रो जर्सीत बघायची इच्छा अनेक चाहत्यांनी होती. मात्र तो निवृत्त झाल्याने हे शक्य होणार नाही हेही चाहते जाणुन होते. मात्र सोमवारी २६ जुलै रोजी धोनीचा एक फोटो व्हायरल झाला. या फोटोत धोनी रेट्रो जर्सीत दिसत आहे. धोनीचा हा फोटो सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. एका जाहीरातीसाठी धोनीने रेट्रो जर्सी घातली असल्याची माहिती समोर आली आहे. या जाहीरातीत धोनीसोबत फराह खान दिसत आहे.

धोनीच्या या फोटोला चाहत्यांनी खुप पसंती दर्शवली आहे. धोनीचा रेट्रो जर्सीतील फोटो म्हणजे चाहत्यासाठी स्वप्नपुर्तीच होती. यादरम्यान आयपीएल २०२१च्या उर्वरीत हंगामात तो चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएल २०२१च्या उर्वरीत हंगामात सीएसकेचा पहिला सामना हा मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. यापुर्वीच्या सामन्यात सीएसकेने दिलेल्या २१८ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने ४ गडी राखत पार केले होते. आता आगामी सामन्यात सीएसके त्या पराभवाचा सुड घेण्याची शक्यता आहे. सीएसके आयपीएल २०२१ गुणतालीकेत सातपैकी ५ सामने जिंकत दुसऱ्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!