Share

काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलणार; पवारांचा ऑफ द रेकॉर्ड गौप्यस्फोट

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पटोले यांनी राजीनामा सोपवल्यानंतर आता झिरवळ यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद असणार आहे. यामुळे आता अध्यक्षपद हे कोणत्या पक्षाकडे जाणार हे महत्वाचं ठरणार आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनौपचारिक प्रतिक्रिया दिली आहे. ‘काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलाचा निर्णय घेतला गेला,’ असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यामुळे पुढील अध्यक्षपदाची जागा ही तिन्ही पक्षांसाठी खुली झाल्याचं ते म्हणाले आहेत.

‘आता नवीन विधानसभा अध्यक्ष ठरवण्यासाठी पुन्हा तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होणार. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते आता खुलं झाले आहे.’ असं वक्तव्य शरद पवार यांनी केल्यामुळे आता अध्यक्षपद काँग्रेसकडून निसटणार का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, काँग्रेसला आता उपमुख्यमंत्री पदाबाबत रस असल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहेत.

त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रितपणे याला सहमती देणार का ? हे देखील महत्वाचं ठरणार आहे. तसं झाल्यास राज्यात दोन उपमुख्यमंत्री पदाच्या जागा निर्माण होतील. सद्या कर्नाटक राज्यात दोन उपमुख्यमंत्रीपद आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!