Share

महाराष्ट्रात कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर संघटनात्मक बदल करावे लागणार

Published On: 

मुंबई : नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी काल काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांची 10 जनपथ या निवासस्थानी भेट घेतली होती.विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पटोले यांनी राजीनामा सोपवल्यानंतर आता झिरवळ यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद असणार आहे.

दरम्यान, पटोले यांच्या राजुनाम्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपद हे कोणत्या पक्षाकडे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.अशातच,नवीन विधानसभा अध्यक्ष पदाबाबत पुन्हा चर्चा होणार असल्याचे खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे असं वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. दरम्यान, काँग्रेस देखील उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असून विधानसभेचे अध्यक्षपद हे शिवसेनेकडे जाईल अशा चर्चा सुरु आहेत.

महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक बळकट करण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षासोबत महाराष्ट्रात आणखी काही संघटनात्मक बदल केले जाणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. राज्यातील काँग्रेसचे कार्याध्यक्ष बदलण्यासाठी हायकमांड आग्रही असल्याचे कळते. संघटनात्मक बदल करताना मंत्र्यांऐवजी पूर्णवेळ पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी देण्याकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठीचा कल असल्याचे समजते. आता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यावर पुढे पक्ष वाढीसाठी पटोले आणि कॉंग्रेस श्रेष्ठी काही नव्या चेहऱ्यांना संधी देतील अशी शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!