🕒 1 min read
मुंबई – नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनात महत्वाची भूमिका असणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. शिवसेनेकडे असलेले वनखाते शिवसेनेकडेच राहून मला विधानसभेचा अध्यक्ष केले तर मला आनंद आहे,अशी रोखठोक भूमिका भास्कर जाधव यांनी मांडली आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेनी आपल्या कोट्यातील मंत्रीपदाचा बळी देवू नये असेही जाधव यांनी स्पष्ट केले. विधानसभेचे अध्यक्षपद मला मिळासे तर आनंद आहे मात्र अध्यक्ष नाही झालो तरी सभागृहात बसून विरोधकांचा सामना करेन, असेही जाधव म्हणाले.महाविकास आघाडी सरकार पुढील पाच वर्ष टिकणे महत्वाचे आहे. त्यासाठीचा अजेंडा ठरलेला आहे, हे जरी खरं असलं तरी, तुझं किती-माझं किती करण्यापेक्षा वनखाते शिवसेनेकडे ठेवून विधानसभा अध्यक्षपद देखील शिवसेनेला द्यावे, अशी विनंती भास्कर जाधव यांनी केलीय.
दरम्यान, यानंतर कॉंग्रेसने देखील स्पष्ट भूमिका घेतली असून हे पद आपल्याकडेच राहणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विधानसभेच्या अध्यक्षपदावरून महाविकासआघाडीतील पक्षांमध्ये सुरु असलेल्या रस्सीखेचीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाकडेच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा तिढा निकालात काढला. आमचा तीन पक्षांचा निर्णय स्वच्छ झालाय, विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही. तिन्ही पक्षांनाही काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट कर्णधार : सूर्यकुमार यादव
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांवर निकम यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- अबू आझमीच्या पुतण्याला एनसीबीचे समन्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
