मुंबई : शिखर धवनच्या नेतृत्वातील मर्यादित षटकांचा संघ श्रीलंका दौर्यावर गेला आहे. 13 जुलैपासून सुरू झालेला हा दौरा 25 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. श्रीलंकेत टीम इंडिया तीन एकदिवसीय सामने आणि तब्बल टी -20 सामने खेळणार आहे. या दौर्याची सुरुवात वनडे मालिकेपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी, दुसरा 16 रोजी आणि तिसरा वनडे 18 रोजी खेळला जाईल. मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवचीही निवड झालेली आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करताना दिसला आहे. आयपीएलच्या 13 व्या मोसमात त्याने धडाकेबाज कामगिरी केली होती. नुकतंच त्याने इंग्लंडविरुद्ध मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सूर्याने थोड्याच वेळात आपली ओळख निर्माण केली. रोहित शर्माचा सूर्यकुमारच्या यशात मोठा हात आहे. रोहितने त्याच्या नेतृत्वात सूर्याला सतत खेळण्याची संधी दिली आहे. यामुळेच विराट कोहलीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सूर्यकुमार रोहितला आपला आवडता कर्णधार मानतो.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करताना सूर्या म्हणाला की, “रोहित आपल्या कर्णधारपदी पूर्णपणे स्पष्ट आहे. कोणता गोलंदाजाला केव्हा चेंडू द्यायचा आहे किंवा कोणत्या खेळाडूला कुठे फिल्डिंगला ठेवायचे आहे हे रोहितला चांगलेच माहित आहे. रोहित आयपीएलचा सर्वोत्कृष्ट कर्णधारही आहे. 8 वर्षात त्याने आपल्या नेतृत्वात 5 वेळा विजेतेपत मिळवले आहे ही मोठी गोष्ट आहे.”
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगें’ धोनीसोबत मीही निवृत्ती घेणार, रैनाचं मोठं वक्तव्य
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू!’, चंद्रकांत पाटील यांचा टोला
- ‘तोल सांभाळा! नाहीतर महाराष्ट्रातही काँग्रेस अशीच कोसळेल’, ‘त्या’ घटनेवरून भाजपचा सल्ला
- ‘उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइनचे प्रस्ताव चार टप्प्यांत द्या’, खा.ओमराजेंच्या सूचना


