Share

शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांवर निकम यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Published On: 

जळगाव – राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड बराच वेळ चर्चा सुरु होती. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, त्यामुळे उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.

दरम्यान, यानंतर निकम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून शिवसेना प्रवेशाचे वृत्त फेटाळले आहे.मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझी बंद दाराआड चर्चा झाली. मात्र, त्याचा तपशील आत्ताच सांगता येणार नाही. यापूर्वी मी शरद पवार यांचा प्रस्तावही नाकारला होता. खासदार संजय राऊत आणि माझी गेल्या महिन्यातील भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येतात, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!