🕒 1 min read
औरंगाबाद : तुमच्या तोंडाला मास्क नसेल तर आता पोलिसही पाचशे रुपयांच्या दंडाची पावती देऊ शकतात. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पोलिसांना दंड वसुलीचे अधिकार दिले आहेत. वसुल झालेल्या दंडातील अर्धी रक्कम पोलिस कल्याण निधीला दिली जाणार आहे तर उर्वरित रक्कम महापालिकेला दिली जाईल.
महापालिकेने शहरात कोरोना नियमाचे उल्लघंन करणाऱ्या नागरिकांकडून दंडात्मक कारवाई करण्यासाठी नागरिक मित्र पथकाची स्थापना केली आहे. त्यात माजी सैनिकांचा समावेश आहे. रस्त्यावर, गर्दीच्या ठिकाणी कोणी विनामास्क आढळून आला तर ५०० रुपये दंड वसुल करण्यात येतो. आत्तापर्यंत हजारो नागरिकांकडून दंड वसुल करण्यात आला आहे. मात्र या पथकातील सदस्य संख्या फक्त ५० एवढी आहे. या पथकाकडे इतर कामगिरीही देण्यात आली आहे. यात प्लास्टीकबंदीची अंमलबजावणी करणे, रस्त्यावर कचरा जाळणे, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकून अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करते.
दरम्यान शहरात कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे व दुसरीकडे वारंवार आवाहन करून देखील नागरिक मास्क वापरत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेचे प्रशासक आस्तिकुमार पांडेय यांनी मंगळवारी विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांतर्फे वसुल होणाऱ्या रक्कमेतील ५० टक्के रक्कम पोलिस कल्याण निधीला दिला जाईल व उर्वरित रक्कम महापालिकेला दिली जाईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- दुखापतीमुळे ‘हा’ गोलंदाज टी20 सीरीज मधून बाहेर ?
- ‘मुख्यमंत्री साहेब… तुमच्या वाहतूक पोलिसांना भिक मागायचे धंदे सोडून द्यायला सांगा’
- कोरोना योद्ध्यांची लसीकरणाकडे पाठ, मात्र जेष्ठांचा उत्तम प्रतिसाद
- लॉकडाऊनसारखे कठोर निर्णय घ्यावे लागतील – इक्बाल चहल…
- ‘ये तो बिल्कुल नही बदला यार’ ; सचिन-युवराजची विकेट घेतल्यानंतर माँटी पानेसर सोशलवर चर्चेत


