मुंबई- गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यस्थेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे. पूजा चव्हाण,मनसुख हिरेन,महेबूब शेख यासारख्या प्रकरणांमुळे गृहखात्यावर चौफेर टीका होत आहे.विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक देशमुख करत असताना आता एका ड्रायव्हरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून तेलंगाना येथील एका गाडी चालकाने महाराष्ट्र राज्याच्या वाहतूक पोलिसावर गंभीर आरोप केले आहेत. आम्ही तेलंगाना राज्यातून आपल्या राज्यात आलो आहोत, आल्या नंतर आमच्याकडे आमच्या गाडीचे सर्व कागद पत्र असतात तरी सुद्धा तुमचे वाहतूक पोलीस अधिकारी जबरदस्ती पैसे वसुली करून मारत आहेत असा गंभीर आरोप या चालकाने व्हिडिओ च्या माध्यमातून केला आहे.
या गोष्टी मुळे आम्ही खूप दुखी आहोत आमच्या राज्यातून आणि इतर राज्यातून तुमच्या राज्यात आम्ही फिरण्यासाठी येत असतो शिर्डी, मुंबई, कोल्हापूर मंदिर, विठ्ठल मंदिराला भेट देतोत. पण बाहेरच्या राज्यात्तील गाडी पाहिली की तुमचे पोलीस अडवतात.हे काय आहे? असा सवाल मुख्यमत्री उद्धव ठाकरेंना यांना केला आहे. सर्व पेपर आहेत तरी पण १२००,६००,२०० चे पावती फाडतात आणि मारतात. तुमच्या वाहतूक पोलीसांना काय अडचण आहे विचारा, कशाचे पैसे भरायचे हे भिक मागणे सोडून द्या म्हणा, असा आरोप चालकाने केला आहे.
तुम्ही या आमच्या राज्यात आणि बघा आमच्या गावात या आमचे पोलीस थांबवत नाहीत पेपर दाखवा आणि जा असे सांगतात. आमचे पोलीस भिकारी धंदे करत नाहीत. तुमचे पोलीस का मारत आहेत, त्यांना काय अडचण आहे विचारा त्यांना काय पैसे कमी पडत असतील तर १२ तास नोकरी करून त्यांनतर त्यांना भिक मागायची नोकरी करा म्हणा असा संतप्त सल्ला देखील त्याने दिला आहे.
आम्ही काय भारतीय नागरिक नाहीत आहोत काय असा प्रश्न पण मुख्यमत्री ठाकरेंना यांना केला आहे.मी चुकून जास्त बोललो असेल तर मला माफ करा, आमच्या राज्याला भेट देऊन चांगली वाहतूक व्यवस्था आणि चांगले रस्ते कसे असावेत आमच्या मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शन घ्या असा सल्ला देखील त्याने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- माझ्या वडिलांनी ऊस तोडला, मजुरांच्या व्यथा मी जाणतो-धनंजय मुंडे
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात फडणवीसांनी गंभीर आरोप केलेले धनंजय गावडे कोण आहेत ?
- खा.जलील यांच्या कार्यालयामागील इमारत जमीनदोस्त
- रुग्णसंख्या वाढली! सोयगावचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू
- पाचशे रुपयांवरून दोन पोलिसांत तुंबळ हाणामारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

